mahalakshmi aarti

महालक्ष्मीची आरती – Mahalakshmi Aarti in Marathi

महालक्ष्मी देवी हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत. त्या समृद्धी, धन, संपत्ती आणि वैभव यांच्या देवी म्हणून पूजल्या जातात. महालक्ष्मीला विष्णूची पत्नी मानले जाते आणि ती सृष्टीच्या पालनकर्त्याच्या रूपात ओळखली जाते. भारतीय संस्कृतीत महालक्ष्मी देवीला विशेष महत्त्व आहे आणि त्यांच्याशी संबंधित अनेक कथा आणि पुराणप्रसंग आहेत.

Mahalakshmi Aarti in Marathi Lyrics

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥

*****

Mahalakshmi Aarti in Marathi lyrics को हमने ध्यान पूर्वक लिखा है, फिर भी इसमे किसी प्रकार की त्रुटि दिखे तो आप हमे Comment करके या फिर Swarn1508@gmail.com पर Email कर सकते है।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top