January 10, 2025

Latest Posts

गणपतीची आरती Ganesh Aarti in Marathi

गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठीं झळके माळ मुक्ताफळांची । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥ध्रु.।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा। हिरेजडित मुगुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥ जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावें, निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती. ॥ ३ ॥

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥०१॥

मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया ॥०२॥

तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला ॥०३॥

तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥

मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरयो ॥

गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया

गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥

सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥

गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ।
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता ।
अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे ।
चरणी ठेवितो माथा ॥०१॥

पहा झाले पुरे एक वर्ष ।
होतो वर्षानं एकदा हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श ।
घ्यावा संसाराचा परामर्ष ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची ।
वाचावी कशी मी गाथा ॥०२॥

आली कशी पहा आज वेळ ।
कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गूळ-फुटाणे खोबरं नि केळं ।
साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण ।
तूच पिता तूच माता ॥०३॥

नाव काढू नको तांदुळाचे ।
केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घराचे ।
दिन येतील का रे सुखाचे ।
देवा जाणुनि गोड मानुनि ।
द्यावा आशीर्वाद आता ॥०४॥

एकदंता गुणवंता गौरी सुखसदना

एकदंता गुणवंता गौरी सुखसदना ।
ऋद्धिसिद्धिदायक कलिकिल्मिषदहना ॥
उन्नत गंड स्रवतीं डुलती नग नाना ।
शुंडादंडे मंडित गंभिर गजवदना ॥०१॥

जय देव जय देव जय शंकरकुमारा ।
पंच आरती उजळूं सुरवर पूजा देवा तुझि करिती ॥
लाडूधर वरदका मुनिजन गुण गाता ।
कणीं कुंडले देखुनि रविशशि लपताती ॥०२॥

चरणीं नुपुरांची रूणझुणध्वनी उठली ।
घोषें दुमदुमली ॥
अदभुत पंचभूते तेथुनि उद्भवली ॥०३॥

ऐंसे वैभव तुझें नाटक नृत्याचें ।
देखुनियां लुब्धलें मन गंधर्वाचें ॥
ऐकुनि चिंतन करणें तुझिया चरणाचें ।
चिंतन करिता नासे दु:ख विश्वाचें ॥०४॥

कमलासन भयनाशन गिरिजानंदना ।
कटि सुंदर पीतांबर फणिवरभूषणा ॥
विद्यावर पदिं तोडर अमरारीमथना ।
मनरंजन रहिमंडण गणपती गुरू जाणा ॥०५॥

जय श्रीगणेशा

जय श्रीगणेशा गणपती देवा, आरती मी करितो ।
मोरया आरती मी करितो ।
मोरया आरती मी करतो ।
भक्तां संकटी पावुनी सकला प्रसन्न तू होतो ॥

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी, पार्थिव तुज करिती ।
मोरया पार्थिव तुज करिती ॥
भक्तां पावुनी अंती तयाला मोक्षाला नेसी ॥०१॥

नाना परीची द्रव्ये-पुष्पें तुजला अर्पिती ।
मोरया तुजला अर्पिती ॥
मोदक आणिक रक्ताफुलांवरी किती तुझी प्रीती ॥०२॥

भक्त रक्षणासाठी देवा, अष्टस्थानीं प्रकटशी ।
मोरया अष्टस्थानीं प्रकटशी ॥
तू मायेची फुंकर घालुनी, तयांस उद्धरशी ॥०३॥

स्थावर क्षेत्रीं पंचदेवता, तुजला प्रार्थिती ।
मोरया तुजला प्रार्थिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी मोरेश्वर होसी ॥०४॥

थेऊर क्षेत्रीं भक्त तुझे बहु, चिंता ते करिती ।
मोरया चिंता ते करिती ॥
चिंता हरिशी म्हणूनी गणेशा, चिंतामणि म्हणती ॥०५॥

पल्लव क्षेत्री भक्त चिमुकलें, तुजला पूजिती ।
मोरया तुजला पूजिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, बल्लाळेश्वर होसी ॥०६॥

दत्तात्रेय सुत विनवितसे चरणी ।
मोरया विनवितेस चरणी ॥
सर्व जनाते संकटी रक्षी, हीच असे विनवणी ॥०७॥

गणेश आरतीचे फायदे

ही आरती भक्तांना जीवनात शांती, आत्मज्ञान आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यास मदत करते. भगवान गणेशाची आरती विशेषतः त्यांचे अनुयायी आणि भक्त करतात, जे त्यांच्या आशीर्वाद आणि कृपेसाठी समर्पित असतात.

Shree Ganpati Aarti Lyrics को हमने ध्यान पूर्वक लिखा है, फिर भी इसमे किसी प्रकार की त्रुटि दिखे तो आप हमे Comment करके या फिर Swarn1508@gmail.com पर Email कर सकते है।

Latest Posts

spot_imgspot_img

Aarti

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.